पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आलमट्टीतून ५,००,००० क्युसेक्सने विसर्ग

आलमट्टी धरणातून विसर्ग झाल्यामुळे विजापूर ते होस्पेट आलेले पाणी.

आलमट्टी धरणातून पाच लाख क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित ४ दरवाजे खुले आहेत. त्यामधून ७११२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग आणि पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली आहे. आज सकाळी ७ वाजता कोयना धरणामधून ७७९८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्रातील महापुराचे हे सुद्धा एक कारण...

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी ७ वाजता ५२ फूट २ इंच असून, एकूण १०७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर ८.३० टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पूरग्रस्तांना मदतीच्या धान्यावर भाजप आमदाराचा फोटो, विरोधकांची टीका

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ३.२८  टीएमसी, वारणा ३२.२६ टीएमसी, दूधगंगा २३.१५ टीएमसी, कासारी २.५२ टीएमसी, कडवी २.५२ टीएमसी, कुंभी २.५३ टीएमसी, पाटगाव ३.७२ टीएमसी, चिकोत्रा १.४०, चित्री १.८८ टीएमसी, जंगमहट्टी १.२२ टीएमसी, घटप्रभा १.५६ टीएमसी, जांबरे ०.८२ टीएमसी, कोदे ०.२१ टीएमसी असा आहे.