पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात पावसाने घेतला ११ जणांचा बळी; चौघे बेपत्ता

पूराच्या पाण्यामुळे गाड्यांची अवस्थी अशी झाली होती. (हिंदुस्थान टाइम्स)

पुण्यामध्ये बुधवारी रात्री नऊनंतर पडलेल्या मुसळधार पावसाने ११ जणांचा बळी घेतला आहे. मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता. या पूराचे पाणी अरण्येश्वर परिसरातील टांगेवाले कॉलनी परिसरामध्ये शिरले. त्यामुळे या कॉलनीतील अनेक घरांच्या भिंती खचल्या. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. खेड-शिवापूर, सिंहगड रस्ता याही ठिकाणीही पावसामुळे नागरिक मृत पावले आहेत.

भिंत पडल्यामुळे मृत पावलेल्यांची नावे

रोहित आमले (१५), संतोष कदम (५५), जान्हवी सदावर (३२), श्रीतेज सदावर (८), लक्ष्मी पवार (६९)

वाहून गेल्यामुळे मृत पावलेल्यांची नावे

ज्योत्स्ना राणे (३५), दत्तात्रय गिरमे (५२), अमृता सुदामे (३७)

दरम्यान, सिंहगड रोडवर पूराच्या पाण्यात वाहून गेलेल्या कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर येथे ५ जण वाहून गेले होते. त्यातील ३ जणांचे मृतदेह सापडले तर दोघांचा शोध सुरु आहे. त्यामुळे मृतांचा आकडा १२ वर पोहचला आहे.  

पुण्याला पावसाने झोडपले; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पुणे शहराला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. ढगफुटीसारखा पाऊस कोसळत होता. विशेषतः पुण्याच्या दक्षिण भागात पावसाचा जोर अतिप्रचंड असा होता. पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते.  पावासाचे पाणी शहरातील अनेक वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये शिरले. अरण्येश्वर परिसरातील टांगेवाले कॉलनी ही आंबील ओढ्याच्या शेजारी आहे. मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्याला पूर आला. पूराचे पाणी टांगेवाले कॉलनीत शिरल्याने याठिकाणी असणाऱ्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. भिंत खचल्याने ६ जणांचा मृत्यू झाला तर ४ जण पूराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद होणार या फक्त अफवा: आरबीआय

पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरामध्ये पूराचे पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार उदध्वस्त झाले आहेत. शहरातील अनेक भागातील गाड्या पूराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफची टीम सुरक्षित स्थळी हलवत आहे. दरम्यान, अतिवृष्टी पाहता पुण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे, बारामती, भोर, हवेली, सासवड याठिकाणच्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, पावसामुळे पुण्यातील पाणी पुरवठा आणि वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. 

येत्या शुक्रवारी स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाणार - शरद पवार