पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील शास्त्रज्ञांनी टिपली जीवघेण्या कोरोनाची प्रतिमा

'इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च' मध्ये कोरोना विषाणूची प्रतिमा प्रकाशित करण्यात आली आहे.

जगभरात थैमान घातलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूची प्रतिमा पुण्यातील शास्त्रज्ञांनी  ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्प इमेजिंग वापरुन टिपली आहे. ही प्रतिमा 'इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च' मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

RBIचा हफ्ते स्थगित करण्याचा बँकांना फक्त सल्ला, पण...

कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकलेल्या जगभरातील 5 लाख 40 हजारापैकी मृतांचा आकडा 25 हजारच्या घरापर्यंत पोहचला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण हा चीनच्या वुव्हान शहरात डिसेंबर 2019 मध्ये आढळला होता. त्यानंतर भारतातील पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला होता.

मुंबईत कोरोनाचे आणखी ९ रुग्ण; राज्यातील बाधितांचा आकडा १५६ वर 

केरळमधील रुगाचे नमुने हे पुण्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी लॅबमध्ये तपासण्यात आले होते. केरळमधील रुगामध्ये आढळलेल्या विषाणूची प्रतिमा ही वुव्हानमधील शहरातील रुग्णाच्या विषाणूच्या प्रतिमेशी जवळपास 99.98 टक्के मिळती जूळती आहे. या विषाणूचा आकार हा  75 मिमी इतका आहे.