पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हडपसरमध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू

गोळीबार (प्रतिकात्मक छायाचित्र)

पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. मंगळवारी रात्री हडपसरमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारामध्ये एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. 

कलम ३७०: पाकिस्तानने युएनएससीकडे बैठकीची केली मागणी

फुरसुंगी येथे दोन गटात वाद झाला. या वादानंतर एका गटातील तरुणाने दुसऱ्या गटावर गोळीबार केला. ही गोळी रस्त्यावरुन जात असलेल्या ५५ वर्षाच्या पंचय्या सिध्दय्या स्वामी यांना लागली. गोळीबारात ते गंभीर जखमी झाले.  गोळीबारानंतर दोन्ही गटातील तरुण फरार झाले. 

१५ ऑगस्टपर्यंत अजित डोवाल यांचा काश्मीर खोऱ्यात 'मुक्काम'

दरम्यान, गोळीबारात जखमी झालेल्या पंचय्या सिध्दय्या स्वामी यांना तातडीने पुण्यातल्या नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पंचय्या स्वामी हे पुण्यातील एका बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. ड्युटी संपल्यानंतर ते घरी जात असताना ही घटना घडली. 

स्वातंत्र्यदिनी अमित शहांचा काश्मीर दौरा ठरलाय, पण...