पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पिंपरी-चिंचवडमधील भोसरीत गोळीबाराची घटना

गोळीबार (प्रतिकात्मक छायाचित्र)

पिंपरी-चिंचवडमधील असलेल्या भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहाच्या परिसरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्हीच्या फुटेजच्या माध्यमातून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

रवी जगदाळे या सराईत गुन्हेगाराने या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. संजू गुप्ता उर्फ सँडीने जुन्या वादातून आपल्यावर गोळीबार केला, अशी तक्रार रवी जगदाळेने पोलिसांत नोंदवली आहे. संजू गुप्ता हा देखील सराईत गुन्हेगार असुन तक्रारीनंतर पोलिस त्याचा शोध घेत आहेत. जगदाळे आणि गुप्ता या दोघांच्यात दुकान लावण्याच्या कारणावरुन वाद झाले होते. या वादातूनच हा सर्व प्रकार घडल्याचे समोर येत आहे.