पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील बेकर कंपनीला लागलेली आग नियंत्रणात

बेकर कंपनीला लागलेली आग (फोटो सौजन्य अग्निशामक दल)

पुण्यातील विमाननगर भागातील बेकर कंपनीला शुक्रवारी सकाळी मोठी आग लागली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी केलेल्या प्रयत्नांनंतर सुमारे पाच तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

चारित्र्यावर संशय घेऊन पतीचा पत्नीवर चाकूहल्ला, गळा कापून आत्महत्या

शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर सातत्याने आगीवर पाण्याचा फवारा करून त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले. आग कशामुळे लागली, याचा शोध घेण्यात येतो आहे.