पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातल्या दांडेकरनगरमध्ये गोदामाला भीषण आग

पुण्यात गोदामाला आग

पुण्यामध्ये एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. येवलेवाडीतील दांडेकरनगरमध्ये हे गोदाम आहे. सकाळी सव्वासातच्या सुमारास या गोदामाला अचानक भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

पुढचे तीन दिवस मुंबईत मुसळधार; कोकण, गोव्यात होणार अतिवृष्टी

दांडेकरनगरमध्ये तेल आणि खाद्यपदार्थाचे गोदाम आहे. या गोदामाच्या बाहेर उभ्या असलेल्या ट्रकने पेट घेतल्यानंतर गोदामाला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या आगीमध्ये कोणतिही जीवितहानी झाली नाही तसंच कोणी जखमी झाले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ८ गाड्या, ३ पाण्याचे टँकर आणि दोन जेसीबी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. आग लागल्यामुळे घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.  

मुंबईकरांची पाण्याची चिंता संपली; तानसा धरण ओव्हरफ्लो