पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात पिसोळीमध्ये भीषण आग, फर्निचर गोडाऊन भस्मसात

पुण्यात पिसोळीमध्ये फर्निचर गोडाऊनला लागलेली आग. (एचटी फोटो)

पुण्यातील पिसोळी भागात एका फर्निचरच्या गोडाऊनला बुधवारी सकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे तीन बंब आणि पाण्याचे दोन टँकर लगेचच घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यास सुरुवात करण्यात आली. आगीमुळे संपूर्ण गोडाऊन भस्मसात झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. प्राथमिक तपासानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

बोर्डिंग गेटपर्यंत जाणे ही प्रवाशांची जबाबदारी, सुप्रीम कोर्टाचा निकाल

या संदर्भात माहिती देताना कोंढव्यातील अग्निशामक दलाचे अधिकारी प्रकाश गोरे म्हणाले, बुधवारी सकाळी ७.२२ वाजता आम्हाला याची माहिती मिळाली. लगेचच आमचे बंब घटनास्थळी दाखल झाले. पिसोळी भागात धर्मावत पेट्रोल पंपामागे हे गोडाऊन आहे. आग लागली त्यावेळी आतमध्ये कोणीही नव्हते. त्यामुळे या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. आमचे तीन बंब आणि २५ ते ३० कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नांनंतर अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणली.

CAA विरोधात बहुजन क्रांती मोर्चाचा रेल रोको, म.रे २० मिनिटे उशिराने

आगीमध्ये गोडाऊनमधील लाकडी वस्तू, कच्चा माल, इलेक्ट्रिकच्या मशिन या सर्वांचे मोठे नुकसान झाले आहे. यातील अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या गोडाऊनजवळ तेलाची साठवणूक केलेले गोडाऊनही आहे. त्यामुळे आम्ही प्राधान्याने आग या गोडाऊनपर्यंत पसरणार नाही, याची आधी खबरदारी घेतली. आगीमध्ये गोडाऊनच्या मालकाचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती प्रकाश गोरे यांनी दिली.