पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात फर्निचर दुकानाला भीषण आग

पुण्यात फर्निचर दुकानाला भीषण आग

पुण्यातील कर्वे रस्त्यावरील एका फर्निचर दुकानाला भीषण आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. रॉयल क्लासिक फर्निचर या दुकानाचे नाव आहे. एसीमधील बिघाडामुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. 

तुकडे-तुकडे गँगला जनेतेने धडा शिकवावाः अमित शहा

कर्वे रस्त्यावर रॉयल क्लासिक नावाचे फर्निचरचे दुकान आहे. या दुकानात अचानक आग लागली आणि पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचली. पहिल्या मजल्यावरही फर्निचर मोठ्याप्रमाणात आहे. सर्व ज्वलनशील साहित्य असल्यामुळे आगीने लगेचच पेट घेतला. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 

रेल्वे मंत्री म्हणतात, १६६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे घडलंय

परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. वर्दळीच्या ठिकाणी ही आग लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. 

मीम्सचा आनंद घ्या, मोदींचं 'कूल' उत्तर