पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पिंपरीत विहिंपच्या शोभायात्रेत मुलींच्या हाती एअर रायफल, तलवारी; गुन्हा दाखल

पिंपरीतील यमुनानगर येथे ही शोभायात्रा काढण्यात आली.

विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) वतीने रविवारी (दि. २ मे) रात्री पिंपरी-चिंचवड येथील निगडीमधील यमुना नगर येथे मुलींच्या हातात एअर रायफली आणि तलवारी देऊन विनापरवाना देऊन शोभायात्रा काढण्यात आली. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात विहिंपच्या तीन नेत्यांसह सुमारे २०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विहिंपच्या वतीने रविवारी अंकुश चौक ते ठाकरे मैदानदरम्यान शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत सहभागी झालेल्या काही मुलींच्या हातात एअर रायफली आणि तलवारी देण्यात आल्या होत्या. यावेळी जोरजोरात घोषणाही दिल्या गेल्या. ही शोभायात्रा विनापरवाना काढण्यात आली होती. शोभायात्रेत कार्यकर्त्यांनी शस्त्रे बाळगल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात विहिंपचे नेते शरद इनामदार, धनाजी शिंदे आणि नितीन वाटकर यांच्यासह सुमारे २०० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एअर रायफलने हवेत गोळीबार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हातात शस्त्रास्त्र घेतलेल्या मुलींची ओळख पटलेली नाही. तसेच विहिंपच्या तिन्ही नेत्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

दरम्यान, सध्याच्या युगात महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणींचा सामना करण्याचे प्रशिक्षण दुर्गा वाहिनी प्रशिक्षण दिले आहे. तो आमच्या आठ दिवसांच्या प्रशिक्षणाचा भाग होता. आम्ही पोलिसांना याबाबत पत्र दिले होते. त्यांना आठ दिवसांचे नियोजनही पाठवले होते. पोलिसही शोभायात्रेत उपस्थितीत होते, असे विहिंपकडून सांगण्यात आले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:FIR registered against 200 workers of VHP for firing and showcasing air rifles swords in a rally in Nigdi Pune