पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'CAA' विरोधात फर्ग्युसन कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन

विद्यार्थी आंदोलन

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ईशान्य भारतात जोरदार आंदोलन सुरु आहेत. याचे पडसाद हळूहळू देशभरामध्ये उमटायला लागले आहेत. मुंबईपाठोपाठ आता पुण्यामध्ये देखील या कायद्याविरोधात आंदोलनं सुरु झाली आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि जामिया हिंसाचाराविरोधात पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. 

जामिया हिंसाप्रकरणी १० जणांना अटक

फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी इन्कलाब जिंदाबादचे पोस्टर झळकावत जोरदार घोषणाबाजी करत नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध केला. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत. 

सोशल मीडियांवरील अफवा, फेक न्यूज रोखा, केंद्राची राज्यांना सूचना