पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे विभागात ६६ हजार स्थलांतरित मजुरांची सोय

दीपक म्हैसेकर

सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे ३६ हजार ७१ क्विंटल अन्नधान्याची तर ७ हजार १८८ क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात ९ हजार ७०२ क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक १२ हजार २६५ क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

'देशात आतापर्यंत १ लाख २१ हजारहून अधिक जणांची तपासणी'

पुणे विभागात ७ एप्रिल २०२० रोजी ९९.९६ लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून २२.५९ लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात ६५ हजार ९६२ स्थलांतरित मजुरांची सोय

१ लाख २० हजार २४२ मजुरांना भोजन

लॉकडाऊन १४ एप्रिलला संपवणे अशक्य, नरेंद्र मोदी यांचे सूचक विधान

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत ११७ कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत ५८२ कॅम्प असे पुणे विभागात एकुण ६९९ रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये ६५ हजार ९६२ स्थलांतरित मजूर असून १ लाख २० हजार २४२ मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

कोरोनामुळे भारतातील ४० कोटी कामगार गरिबीत अडकण्याची शक्यता

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:facility provided 66 thousand migrated worker in pune division amid outbreak of coronavirus