पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोल्हापूर, सांगली, पुण्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुण्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. शुक्रवारी या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आधीच गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे आणि धरणांतून होणाऱ्या विसर्गामुळे कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरस्थिती भीषण स्वरुपाची आहे. लाखो लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर कऱण्यात आले आहे. त्यातच पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये शुक्रवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे.

पंचगंगेच्या पाणी पातळीत घट, पण कोल्हापुरात पूरस्थिती अद्याप कायम

पूर्व मध्य प्रदेशाजवळ निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरातील स्थिती यामुळे पावसाला पोषक स्थिती असल्यामुळे या भागात शुक्रवारी पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी रात्री प्रसिद्ध केलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.

कोल्हापूर, सांगली या दोन्ही जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पूरस्थिती गंभीर बनली आहे. कोल्हापूर शहर आणि सांगली शहर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पंचगंगा आणि कृष्णा नदीचे पाणी घुसले आहे. त्यामुळे सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.