पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कामावरून काढल्यानंतर हिंजवडीतील एका कर्मचाऱ्याची आत्महत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

हिंजवडी आयटी पार्कच्या फेज दोनमधील एमक्युअर कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने कामावरून काढल्यानंतर आत्महत्या केली आहे. सुंदर गोरटे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. कामावरून काढल्यानंतर त्याने कंपनीच्या आवारातच आत्महत्या केली आहे. या संदर्भात कंपनीची बाजू अद्याप समजलेली नाही.

सुंदर गोरटे यांनी स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवर आपल्यावर अन्याय झाल्याचे लिहिले आहे. माझ्यावर दबाव टाकून काही लिहून घेण्यात आले आणि मला कामावरून काढून टाकण्यात आले, असे या पोस्टमध्ये लिहिले आहे. मला कामावरून काढले, तर मी जीव देईन, असे त्यांना सांगितले होते. तरीही मला कामावरून काढून टाकण्यात आले, असेही त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.