पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इंडिगोच्या पुणे-जयपूर विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

इंडिगो

पुण्याहून जयपूरला निघालेले इंडिगोच्या विमानाने गुरुवारी मुंबईत इमर्जन्सी लँडिंग केले. इंजिनामध्ये बिघाड झाल्याने हे विमान मुंबईत उतरविण्याचा निर्णय वैमानिकाने घेतला. वेळापत्रकाप्रमाणे हे विमान गुरुवारी सकाळी ५.३५ वाजता जयपूर विमानतळावर उतरणे अपेक्षित होते. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

गुन्हा दाखल करत संजय राऊतांना अटक करा: राम कदम

मुंबई विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान उड्डाणाच्या आदर्श नियमावलीप्रमाणेच हे विमान मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले. या विमानाचे सध्या परीक्षण केले जात असून, प्रवाशांना दुसऱ्या विमानाने जयपूरला पाठविण्याची सोय केली जात आहे. 

घड्याळवाले आता आमचे पार्टनर, उद्धव ठाकरेंची शरद पवारांवर स्तुतिसुमने

इंडिगोचे हे विमान गुरुवारी पहाटे ३.४० वाजता पुण्यातून उड्डाण करणार होते. पण ते ३.४७ मिनिटांनी आकाशात उडाले. वापीजवळ पोहोचल्यावर इंजिनात बिघाड असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यानंतर मुंबई विमानतळावर पहाटे ४.४१ वाजता या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.