पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंजवडी आयटी पार्कमधील कंपनीत कर्मचाऱ्याची आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीमध्ये कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे हिंजवडी आयटी पार्क हादरले आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील टीसीएस कंपनीमध्ये ही घटना घडली आहे. कपिल विटकर असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

राज्यातील एकाही प्रकल्पाला स्थगिती नाही: CM उद्धव ठाकरे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीसीएस कंपनीमध्ये कपिल विटकर फ्रंट ऑफिसमध्ये काम करत होते. कपिल विटकर मंगळवारी सकाळी ऑफिसमध्ये आले. पाणी आणतो असे सांगून ते सहाव्या मजल्यावर गेले त्याठिकाणी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. सततच्या आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली अल्याचे कारण सध्या पुढे येत आहे. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या पंतप्रधान मोठ्या मनाचे, पण...

दरम्यान, कपिल यांचे ऑफिस तिसऱ्या मजल्यावर आहे. सहाव्या मजल्यावर जाऊन त्यांनी आत्महत्या करेपर्यंत कोणी पाहिले कसे नाही. यावर संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.  पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. 

पीएमसी बँक घोटाळा: आणखी तीन संचालकांना अटक