पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एल्गार परिषद: तपासाची कागदपत्रे ताब्यात घेण्यासाठी NIAची टीम पुण्यात

केंद्राने एल्गार परिषदेप्रकरणातील तपास एनआयएकडे वर्ग केला आहे.

पुण्यातील एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगावमध्ये १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्याचा निर्णय केंद्र सरकारने शुक्रवारी घेतला होता. दरम्यान, एल्गार परिषद तपासाची कागदपत्र ताब्यात घेण्यासाठी एनआयएची टीम दिवसभर पुण्याच्या पोलिस आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडून बसली आहे. 

मोदी आता शाहीन बागेत का जात नाहीतः काँग्रेस

एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे वर्ग करण्याचा शुक्रवारी उशीरा निर्णय झाला होता. यानुसार, मुंबईहून एनआयएच्या ३ अधिकाऱ्यांची टीम तपास ताब्यात घेण्यासाठी आली आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.  केंद्र सरकारने योग्य पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे देशातील शहरी नक्षलवादाचा पर्दाफाश करणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले होते. 

CAA विरोधातील प्रस्ताव मंजूर करणारे प.बंगाल चौथे राज्य

दरम्यान, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्राच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत राज्य सरकारला विश्वासात न घेता भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास घाईघाईने एनआयएकडे देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय असंवैधानिक असल्याचे त्यांनी म्हटले होते. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्य बाहेर येण्याचा भितीने एनआयएकडे तपास सोपवण्यात आला असल्याचा केंद्र सरकारवर आरोप केला होता. तसंच, अन्यायाविरोधात बोलणे म्हणजे नक्षलवाद नाही, असे देखील त्यांनी सांगितले होते.

PHOTOS: चीनमध्ये कोरोना विषाणूचा कहर