पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... आणि एकनाथ खडसेंकडून देवेंद्र फडणवीसांच्या कामाचे कौतुक!

एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले. विरोधी पक्षाने ज्या पद्धतीने काम केले पाहिजे, तसे सध्या विरोधी पक्षाकडून केले जात असल्याचे उदगार एकनाथ खडसे यांनी काढले आहेत. मी विरोधी पक्षनेता असतानाही याच पद्धतीने काम करीत होतो, अशीही आठवण त्यांनी सांगितली. एबीपी माझाने या संदर्भातील बातमी प्रसारित केली. 

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती

एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सर्व काही आलबेल नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. खुद्द एकनाथ खडसे यांनी गेल्या काही महिन्यांत विविध व्यासपीठांवरून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली होती. त्यांनी राज्यातील भाजपच्या नेतृत्त्वावर विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर टीकाही केली होती. गोपीनाथ गडावर डिसेंबरमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी सर्वांसमोर पक्षात आपली घुसमट होत असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

दंगलखोरांकडूनच नुकसानीची वसुली, दिल्ली पोलिस घेणार उत्तर प्रदेशची मदत

राज्यातील शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने देऊ केलेली कर्जमाफी, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने केलेला अवमान, राज्यात महिलांवरील वाढते अत्याचार, हिंगणघाटमधील घटना हे सर्व मुद्दे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष भाजपकडून आक्रमकपणे मांडले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्यांचे कौतुक केले.