पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दसरा स्पेशल: महालक्ष्मीला नेसवली सोनेरी साडी

पुणे महालक्ष्मी देवी

पुण्यातील सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला मंदिर प्रशासनाकडून दस-यानिमित्त सोन्याची साडी अर्पण करण्यात आली. शुद्ध सोन्यात बनवलेली ही साडी जवळपास १६ किलो वजनाची आहे. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

'शरद पवारांना राजकारण आणि समाजकारणातून कायमची विश्रांती देणार'

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी ही साडी नेसविण्यात येते. मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल म्हणाले की, दक्षिण भारतातील कारागिरांनी ८ वर्षांपूर्वी ही सोन्याची साडी साकारली आहे. सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली असून श्री महालक्ष्मी देवीला सोन्याच्या साडीने आभूषित करण्याचे हे ९ वे वर्ष आहे.

पीबल्स, मेयर आणि क्वेलोज यांना यंदाचा भौतिक शास्त्राचा नोबेल

नवरात्र उत्सवात यंदा धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारे विविध उपक्रम राबविण्यात आले होते. दसऱ्यानिमित्त मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी मोठया प्रमाणात रांगा लावल्या होत्या.

'सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने ओबीसींसाठी खूप कामं