पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुलीच्या लग्नाची चिंता; पुण्यात डीएसके ठेवीदाराची आत्महत्या

तानाजी कोरके

पुण्यामध्ये डीएसके ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. मुलीच्या लग्नासाठी गुंतवणूक करुन ठेवलेले पैसे मिळत नसल्याने आता मुलीचे लग्न कसे करायचे या चिंतेतून ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. सुसाईड नोट लिहून तानाजी कोरके (६० वर्ष) या ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. डीएसकेमध्ये त्यांनी साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. 

जीसॅट-३० उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; इंटरनेट स्पीड वाढणार

डीएसकेकडून ठेवी परत मिळत नसल्याने घोरपडी येथील भीमनगर परिसरात राहणाऱ्या तानाजी गणपत कोरके यांनी आत्महत्या केली आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने तानाजी यांनी आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली  आहे. कोरके यांच्या पश्चात चार मुली आहेत. दोन मुलींचा विवाह झाला होता. कोरके हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. 

मुंबईत जानेवारीत सर्वाधिक थंडी, दशकातील नवा विक्रम

कोरके यांनी २०१४ मध्ये डीएसकेमध्ये साडेचार लाखांची रक्कम गुंतवणूक केली होती. २०१७ मध्ये मुदत संपल्यावर रकमेसाठी त्यांनी अनेकदा पाठपुरावा केला मात्र पैसे मिळत नव्हते. कोरके यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये असे म्हटले आहे की, 'माझ्या आत्महत्येस डीएस कुलकर्णी यांना जबाबदार धरून पोलीस खात्याने किमान माझ्या कुटुंबियांना पैसे मिळवून द्यावेत',अशी विनंती त्यांनी या पत्रातून केली आहे. 

मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला दोषी 'डॉक्टर बॉम्ब' बेपत्ता

तसंच, 'माझ्या आत्महत्येनंतर किमान हे पैसे मिळून माझ्या वारस मुलीचे लग्न करतील तेव्हा माझ्या आत्म्यास शांती लाभेल.', असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. त्यांनी आपल्या नावापुढे 'पुण्यातील सुरुवातीपासूनचा शिवसैनिक... जय महाराष्ट्र!' असे म्हणत पत्राचा शेवट केला आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे कोरके कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

मोदींच्या राज्यात तरुणाईवर तुरुंगवास भोगण्याची वेळ : प्रकाश