पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डीएसके घोटाळा: मकरंद कुलकर्णी पोलिसांच्या ताब्यात

डीएसके

डीएसके घोटाळा प्रकरणामध्ये पोलिसांनी आणखी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी पोलिसांनी मकरंद कुलकर्णी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. मकरंद कुलकर्णी हे डी. एस. कुलकर्णी यांचे बंधू आहेत. अमेरिकेला पळून जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मुंबई विमानतळावरुन त्यांना ताब्यात घेण्यात आले. पुण्यामध्ये अडीच हजारांपेक्षा जास्त गुंतुणुकदारांची २०४३ कोटींची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप डी. एस. कुलकर्णी यांच्यावर आहे.

केरळमध्ये पूरबळींचा आकडा ८८ वर; ४० जण बेपत्ता

डीएसके कंपनीमध्ये मकरंद कुलकर्णी हे प्रवर्तक आहेत. त्यांचा देखील या घोटाळा प्रकरणामध्ये समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस मकरंद कुलकर्णी यांचा शोध घेत होते. पण ते सापडत नसल्यामुळे पुणे पोलिसांनी त्यांच्याविरोधात 'लुकआऊट नोटीस' काढली होती. ते अमेरिकेला पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंबई विमानतळावरुन त्यांना अटक केली.

इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड; नितीन गडकरी करत होते प्रवास

दरम्यान, गुंतवणुकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी सध्या येरवडा कारागृहात आहेत. तर डीएसके प्रकरणामध्ये लेखा परीक्षक (सीए) आणि एका वरिष्ठ अभियंत्याविरोधात न्यायालयामध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तसंच, १४ फेब्रुवारीला डी. एस. कुलकर्णी यांची सुमारे ९०४ कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली होती. 

सर्व सार्वजनिक बँका सकाळी ९ वाजता उघडणार