पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या महिलेने तीन वाहनांना ठोकले

पुणे अपघात

पुण्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या एका महिलेने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन चारचाकी गाड्यांना धडक दिली आहे. एकदा नाही तर पुन्हा-पुन्हा ही महिला या गाड्यांना धडक देत होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस

बावधनमधील रामनगर परिसरात मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. मार्व्हल सोसायटीमध्ये राहणारी ही महिला मद्य पिऊन गाडी चालवत होती. सोसायटीतील रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन चारचाकी गाड्यांना या महिलेने धडक दिली आहे. यामध्ये तिन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा प्रकार कळताच सोसायटीतील नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. 

'ईडीच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही'

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला जाब विचारला असता तिने पोलिसांनाच शिविगाळ केला. ऐवढेच नाही तर भर रस्त्यात कपडे काढण्याची धमकी देत अश्लील शेरेबाजी केली. हा सगळा प्रकार पाहून पोलिसांनी घटनास्थळावरुन काढता पाय घेतला. तर, या महिलेची मानसिक स्थिती चांगली नसल्याची माहिती तिच्या पतीने दिली आहे. दरम्यान, या महिलेविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

WTC Point Table: लंका अव्वल, भारत-विंडीज शुभारंभासाठी सज्ज