पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात विक्रम भावेचा जामीन फेटाळला

नरेंद्र दाभोलकर

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयित आरोपी विक्रम भावे याचा जामीन विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयाने शनिवारी फेटाळून लावला. 

विक्रम भावे हा अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांच्या कार्यालयात सहाय्यक म्हणून नोकरीस होता. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने त्याने रेकी केली होती. त्यामुळे भावे याला अटक झाली होती. दाभोलकर हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पुनाळेकर आणि भावे यांना २५ मे रोजी अटक करण्यात आली होती. पुनाळेकर यांना पुणे सत्र न्यायालयाने ३० हजारांच्या जात मुचलक्यावर मागील महिन्यात जामीन दिला आहे.

दाभोलकर हत्याप्रकरणः संजीव पुनाळेकरांना जामीन