पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: विक्रम भावेचा जामीन अर्ज फेटाळला

नरेंद्र दाभोलकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयित आरोपी विक्रम भावेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. पुणे सत्र न्यायालयात विक्रम भावेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. दाभोलकर हत्या प्रकरणात विक्रम भावेवर रेकी केल्याचा आरोप आहे.

 

अशोभनीय, निंदनीय...नव्या व्हिडिओवर संभाजीराजे संतप्त

विक्रम भावे हा अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांच्या कार्यालयात सहाय्यक म्हणून नोकरीला होता. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने रेकी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे भावे याला अटक झाली होती. २०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती.  

'नाईट लाईफ भारतीय संस्कृती नाही, यामुळे निर्भयासारख्या घटना वाढतील'

दाभोलकर हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना २५ मे रोजी अटक करण्यात आली होती. पुनाळेकर यांना पुणे सत्र न्यायालयाने ३० हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन दिला होता. 

प्रियांका गांधींच्या सक्रीय राजकारणाचे एक वर्ष आणि सहा मुद्दे