पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदी धीरज घाटे, स्थायीचे अध्यक्षपद रासनेंकडे

धीरज घाटे आणि हेमंत रासने

पुणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदी मंगळवारी नगरसेवक धीरज घाटे यांची तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक हेमंत रासने यांची निवड करण्यात आली. घाटे आणि रासने यांच्या रुपाने महापालिकेतील ही दोन्ही महत्त्वाची पदे कसबा विधानसभा मतदारसंघातच राहणार आहेत.

'नौदलाकडे २०२२ पर्यंत भारतीय बनावटीची विमानवाहू नौका असेल'

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कसबा पेठ मतदारसंघातून धीरज घाटे, हेमंत रासने हे दोघेही भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. पण भाजपने तत्कालिन महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली. त्यानंतर या दोघांना महापालिकेत मोठे पद दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर ती वास्तवात आली आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपद हे पुढील १३ महिन्यांसाठी हेमंत रासने यांच्याकडे असणार आहे. 

सध्याचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे आणि पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी मंगळवारीच आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर सभागृह नेतेपदी कोणाची निवड होणार आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद कोणाला मिळणार, याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात होती.

धक्कादायक, पुण्यात सिंहगड रस्त्यावर आढळला तरुणीचा मृतदेह

धीरज घाटे हे यंदा पहिल्यांदाच महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तर हेमंत रासने हे तिसऱ्यांदा पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. धीरज घाटे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारक म्हणून काम केले आहे. प्रचारक म्हणून काम थांबविल्यानंतर ते भाजपच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात आले. सध्या ते भाजपचे प्रदेश चिटणीस म्हणूनही कार्यरत आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Dheeraj ghate elected as a pune municipal corporation general body leader hemant rasne standing committee president