पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्नाटक निकालांनंतर देवेंद्र फडणवीसांचे सूचक ट्विट

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जर कोणी जनादेशाचा अनादर करीत असेल तर मतदार त्याला जास्त काळ सहन करीत नाही, हेच कर्नाटक पोटनिवडणुकीच्या निकालांतून दिसून आले असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून कर्नाटकमधील भाजपचे अभिनंदन केले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट सूचक मानले जात आहे.

अमित शहा म्हणाले, ...म्हणून नागरिकत्व सुधारणा विधेयक आवश्यक

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, संधीसाधू राजकारणाला लोक कसे उत्तर देतात हे दिसून आले आहे. जनादेश नसतानाही केवळ सत्तेसाठी एकत्र येणाऱ्यांनाही लोकांनी या निकालातून उत्तर दिले आहे. जनादेशाचा अनादर करणाऱ्यांना लोक जास्त काळ सहन करीत नाहीत हेच सिद्ध झाले आहे.

मुंबई हायकोर्टाकडून अरुण गवळीची जन्मठेप कायम

कर्नाटकमधील पोटनिवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर होत आहेत. १५ पैकी ११ ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी होणार असल्याचे दिसते आहे. यापैकी सहा ठिकाणचे निकाल जाहीर झाले असून, तिथे भाजपच्या उमेदवारांना यश मिळाले आहे. या निकालांमुळे कर्नाटकमधील भाजपचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांचे सरकार बहुमतात आले आहे. त्यामुळे राज्यात राजकीय स्थैर्य निर्माण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राजकीय स्थैर्यासाठी कर्नाटकमधील जनतेने भाजपवर विश्वास दाखवला, याबद्दल त्यांनी तेथील जनतेचे आभार मानले आहेत.