पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजित पवारांचे शक्तिप्रदर्शन, बारामतीत जंगी स्वागत

अजित पवारांचे शक्तिप्रदर्शन, बारामतीत जंगी स्वागत

उपमुख्यमंत्रिपदाचा भार घेतल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीत आलेले अजित पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. हजारो कार्यकर्ते आणि तितकेच सामान्य नागरिकांनी अजित पवार यांचे उत्साहात स्वागत केले. बारामतीच्या रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. जागोजागी अजित पवार यांना पुष्पहार घालण्यात येत होते. महिलांनी औंक्षण केले. बारामतीच्या रस्त्यावर ढोल, ताशे, बँजोच्या गजरात अजित पवार यांची उघड्या मोटारीतून मिरवणूक काढण्यात आली.

बेळगावात 'कनसे'ने तान्हाजी चित्रपटाचे पोस्टर्स उतरवले

अजित पवार यांच्याबरोबर मोटारीत त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हेही उपस्थित होते. मिरवणुकीत युवक, आबालवृद्ध, महिलांचा मोठ्याप्रमाणात समावेश होता. अश्वावर स्वार झालेल्या मुलीही सहभागी झाल्या होत्या. 

जेएनयू हिंसाचार: ३ प्राध्यापकांची दिल्ली हायकोर्टात धाव

मिरवणुकीनंतर अजित पवार यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. बारामतीमधील शारदा प्रांगणात पवार यांचा नागरी सत्कार होणार आहे.