पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

अजित पवार अधिकाऱ्यांशी चर्चा करताना

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक शासकीय जमीन उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक कार्यवाही करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कामकाजाचा आढावा तसेच पुणे मेट्रोच्या आढावा बैठकीत स्पष्ट केले.

'पवारांना जाणता राजा, इंदिरा गांधींना दुर्गादेवी म्हणणं योग्य होतं का'

अजित पवार म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरे तसेच पुणे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा समावेश असलेल्या पीएमआरडीएचे कार्य पुणे जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. शिवाजीनगर- हिंजवडी मेट्रो मार्गिका क्रमांक ३ साठी आवश्यक राज्य शासनाच्या मालकीची १५ हजार चौ. मी. जागा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल.

पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुणे शहर तसेच जिल्ह्यातून जलद पोहोचता येईल, अशा पद्धतीने रस्त्यांचे नियोजन करावे. विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या प्रस्तावित शिवाजीनगर- हडपसर- फुरसुंगी- शेवाळवाडी मेट्रोसाठी भूसंपादन तसेच अन्य बाबी लवकरात लवकर मार्गी लावाव्यात, असे अजित पवार यांनी सांगितले.

मोदींची तुलना शिवरायांसोबत करणाऱ्या लेखकाविरोधात गुन्हा दाखल

यावेळी पीएमआरडीएच्या प्रकल्पांसाठीचे आर्थिक नियोजन, मनुष्यबळ, उत्पन्नाचे स्रोत, पीएमआरडीएच्या माध्यमातून कामे सुरू असलेल्या रिंगरोड, रस्ते, मेट्रो मार्गिका, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प, नगररचना योजना, टाऊनशिप, इंद्रायणी नदीसुधार, प्राधिकरणाच्या हद्दीत पाणीपुरवठा आदी बाबींचा सविस्तर आढावा घेतला.

मंत्रालयात आयोजित या बैठकीस पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार, मुख्य अभियंता विवेक खरवडकर, अतिरिक्त आयुक्त प्रविणकुमार देवरे आदी अधिकारी उपस्थित होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:deputy chief minister ajit pawar statement about hinjewadi to shivaji nagar metro line in pune