पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महादेव जानकरांना ५० कोटींची खंडणी मागितली, ५ जणांना अटक

महादेव जानकर

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आणि शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतल्ले यांना ५० कोटींची खंडणी मागणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील चौघांसह पाच जणांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. 

संशयितांनी जानकर आणि दोडतल्ले यांना राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याची धमकी देत खंडणी मागितली होती. सचिन ज्ञानेश्वर पडळकर (वय ३०, रा. माळशिरस, जि. सोलापूर), विकास शिवाजी आलदार (वय ३४, रा. माढा), तात्यासाहेब लक्ष्मण कारंडे (वय २६, रा. माळेगाव, ता. माढा), इंद्रकुमार देवराव भिसे (वय २१, रा. शिरूर), दत्तात्रय पांडुरंग करे (रा. माळशिरस) अशी पाच जणांची नावे आहेत. 

सोलापुरात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

या पाच जणांनी जानकर व दोडतल्ले यांना फोन करून तुमच्या विषयीच्या काही क्लिप्स आमच्याकडे आहेत. त्या माध्यमांपर्यंत पोहोचवू आणि सोशल मीडियावर व्हायरल करून तुमची बदनामी करू, तुमचे राजकीय जीवन संपवून टाकू, अशी धमकी देत ५० कोटी रुपयांची खंडणी मागितली. तडजोडीअंती ते ३० कोटी रुपयांवर तयार झाले. 

वंचित आघाडी विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवणारः प्रकाश आंबेडकर

याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. गुरुवारी हे पाचही जण बारामतीतील हॉटेल कृष्ण सागरमध्ये पैसे घेण्यासाठी आले. खंडणीतील पहिला हप्ता म्हणून १५ कोटी रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. पोलिसांनी सापळा लावला होता. हे पाच जण येताच त्यांना पैसे घेताना पकडण्यात आले. या पाचही जणांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उद्धव ठाकरेंमुळे ९९ मध्ये युतीचा पराभव, राणेंचा गंभीर आरोप