पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'छुप्या युद्धाच्या प्रयत्नात पाकिस्तान कधीच यशस्वी होणार नाही'

राजनाथ सिंह

देशाच्या सुरक्षेला बाधा आणणाऱ्या प्रत्येकाला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. देशाच्या सुरक्षितता, सार्वभौमत्वाला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्याच्या आड येणाऱ्या कोणालाही सोडणार नाही, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. तसंच, पाकिस्तानकडून दहशतवादाच्या रूपात सुरु असलेल्या छुप्या युद्धाचे प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही, असे देखील राजनाथ सिंह यांनी सांगितले.

सियाचीनमध्ये पुन्हा हिमस्खलन; दोन जवान शहीद

पुण्यामध्ये शनिवारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३७ व्या तुकडीचं दीक्षांत संचलन झाले. यावेळी राजनाथ सिंह यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. पुण्यातील खेत्रपाल परेड मैदानावर हा कार्यक्रम झाला. यावेळी राजनाथ सिंह यांनी सांगितले की, 'दुस-या देशांचा भूभाग बळकवण्याचा भारताचा कधीही उद्देश नव्हता पण भारताच्या हद्दीत शिरून कोणी हल्ला केला तर त्याला भारत सोडणार नाही. दरम्यान, कोणावरही आक्रमण करण्याचा आमचा उद्देश नाही. मात्र कोणी आमच्यावर आक्रमण केले तर आम्ही त्याला सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

फडणवीसांनी खडसेंकडे 'क्लास' लावावा: नवाब मलिक

'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिफेन्स डिप्लोमसीवर भर दिला आहे. त्यांनी पाकिस्तानला जागतिक पातळीवर उघडे पाडले आहे. पाकिस्तान आता एकटा पडला आहे. पारंपरिक युद्धात पाकिस्तान भारताला कधीच हरवू शकणार नाही. युद्धात पराभव पत्करायला लागल्याने पाकिस्तानने दहशतवादाच्या माध्यमातून छुप्या युद्धाचा मार्ग अवलंबला आहे, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. 

'२२ डिसेंबरनंतर उपमुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:defence minister rajnath singh says pakistan through terrorism is indulging in a proxy war