पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हुर्रै! डेक्कन क्वीनची डायनिंग कार बंद करण्याचा निर्णय अखेर मागे

डेक्कन क्वीन डायनिंग कार

पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या प्रसिद्ध डेक्कन क्वीन रेल्वेमधील डायनिग कार बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. पण अनेकांनी या निर्णयाला विरोध केल्यामुळे अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी ही माहिती दिली. त्यामुळे डेक्कन क्वीनमधील डायनिंग कार यापुढेही चालू राहणार आहे.

जैन म्हणाले, डेक्कन क्वीनमधील डायनिंग कार बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. पण हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे डेक्कन क्वीन गाडीसोबत जोडण्यात आलेली डायनिंग कार यापुढेही सुरू राहणार आहे.

पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील गर्दी दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे वाढत्या गर्दीला रेल्वे डब्यांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डेक्कन क्वीनमधील डायनिंग कार बंद करण्याचे ठरविले होते, असे पुण्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी सांगितले. पण या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेकांनी आपला विरोध व्यक्त केला होता.

पुण्यातील रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, डायनिंग कार हा डेक्कन क्वीनचाच एक भाग आहे. त्यामुळे तो बंद केला जाऊ नये. जर प्रवाशांची संख्या वाढली असेल, तर रेल्वेने जास्त डबे जोडावेत. डायनिंग कार बंद करून प्रश्न सुटणार नाही.