पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात पावसाने आतापर्यंत १८ जणांचा घेतला बळी

पुणे पूर

पुण्यामध्ये बुधवारी रात्री नऊनंतर झालेल्या मुसळधार पावसाने आतापर्यंत १८ जणांचा बळी घेतला आहे. तर ९ जण अद्यापही बेपत्ता आहेत. त्याचा शोध घेतला जात आहे. हवामान खात्याने येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे कोणतिही अनुचित घटना घडून नये यासाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी शुक्रवारी सुध्दा शाळा, महाविद्याल्यांना सुट्टी जाहीर केली आहे. पुणे शहरासह हवेली, भोर, पुरंदर, बारामती तालुक्यातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

जाग वाटपावरून युतीत दुमत, भाजप देत असलेल्या जागा

पुणे शहरामध्ये बुधवारी ढगफुटी झाल्यासारखा पाऊस झाला. या पावसामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले. दक्षिण पुण्यात या पावसाने हाहाकार माजवला होता. नदी, नाल्यांना पूर आला होता. रस्त्यांना नदीचे रुप आले होते. अनेकांच्या घरामध्ये सोसयट्यांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे नागरिकांचे संसार उध्वस्त झाले. या पावसाने ८०० पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर २००० पेक्षा अधिक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पूराच्या पाण्यासोबत वाहनं देखील वाहून गेली.

शरद पवार दुपारी ईडी कार्यालयात जाणार; दक्षिण मुंबईत जमावबंदी

या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका कात्रज, बिबवेवाडी, पदमावती आणि सहकारनगर भागांना बसला. पावसामुळे सर्वच रस्त्यांवर चिखलाचे आणि प्लास्टिकच्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. तसंच पुण्यामतील पाणी पुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तसंच विज पुरवठा देखील खंडीत करण्यात आला होता.

पुण्यातील ५ तालुक्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर