पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दाभोलकर हत्या: संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत वाढ

संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना मुंबईहून पुणे येथे आणले (ANI)

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने CBI अटक केलेले अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत ४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने शनिवारी हे आदेश दिले. दोन्ही आरोपींना या आधी १ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. ती आज संपल्याने दोघांनाही न्यायालयापुढे हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी सीबीआय कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने ४ जूनपर्यंत सीबीआय कोठडीत वाढ केली.

दाभोलकर हत्येप्रकरणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना गेल्या शनिवारी अटक करण्यात आली. दोघांनाही गेल्या रविवारी पुण्यातील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. सीबीआयने दोघांनाही मुंबईतून अटक केली होती. 

दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात मॉर्निंग वॉक करत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सीबीआयने सचिन अंदुरे आणि वीरेंद्र तावडे यांना आधीच अटक केली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Dabholkar murder case Pune Sessions Court sends both accused Sanjeev Punalekar and Vikram Bhave to CBI custody till 4th June