पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दाभोलकर हत्या : समुद्राच्या तळातून पिस्तूल शोधण्यात सीबीआयला यश

समुद्राच्या तळातून शोधलेले पिस्तूल

सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा पुरावा हाती आला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अरबी समुद्राच्या तळातून एक पिस्तूल शोधून काढले आहे. हेच पिस्तूल दाभोलकरांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आले असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. समुद्रात पोहोण्यात निष्णात असलेल्या नॉर्वेतील जलतरणपटूंनी अरबी समुद्राच्या तळातून हे पिस्तूल शोधून काढले.

Paytm कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, कंपनीचा 'वर्क फ्रॉम होम'चा निर्णय

आता हे पिस्तूल न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. या प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच हेच पिस्तूल आरोपींनी वापरले होते का, हे स्पष्ट होईल. ऑगस्ट २०१३ मध्ये नरेंद्र दाभोलकरांची पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराजवळ असलेल्या महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या संदर्भात पुण्यातील न्यायालयात दिलेल्या माहितीमध्ये सीबीआयने हे पिस्तूल शोधून काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले होते. ठाण्यातील खारेगाव खाडीजवळ आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेले शस्त्र फेकले होते. तेथून हे पिस्तूल शोधून काढण्यात आले आहे.

जयसिद्धेश्वर महास्वामींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

सीबीआयने या प्रकरणी सात जणांवर आरोप ठेवले आहेत. त्यामध्ये वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे, शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांचा समावेश आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, खूप दिवस समुद्राच्या तळाशी शोध घेतल्यानंतर आम्हाला एक पिस्तूल सापडले. आता दाभोलकरांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांची ज्या गोळ्या लागून हत्या करण्यात आली. त्यांचा आकार आणि या पिस्तुलातून डागण्यात येऊ शकणाऱ्या गोळ्यांचा आकार हे दोन्ही तपासून बघितले जाईल. त्यानंतरच हेच पिस्तूल आरोपींनी वापरले होते का, हे सिद्ध होईल.