पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डीएसकेच्या अलिशान गाड्यांचा लिलाव १५ फेब्रुवारीला होणार

डीएसके

गुंतवणुकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या १३ अलिशान गाड्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. येत्या १५ फेब्रुवारी रोजी या गाड्यांचा लिलाव करण्यात येणआर आहे. मावळचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी या गाड्यांचा लिलाव करण्याचे आदेश दिले आहेत. २३ ऑगस्ट २०१९ रोजी पुणे सत्र न्यायालयाने डीएसके यांच्या गाड्यांचा लिलाव करण्यास परवानगी दिली होती. डीएसके यांच्या गाड्यांचा लिलाव करुन ठेवीदारांचे पैसे देण्यात येणार आहे. 

INDvNZ: नाद करायचा नाय, सुपरओव्हरमध्ये टीम इंडियाचा विजय
 
डीएसके यांच्या अनेक संपत्ती आतापर्यंत जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये त्यांच्या २० अलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. १९ अलिशान कार आणि एका बाईकचा यामध्ये समावेश आहे. बीएमडब्ल्यू, पोर्शे, टोयाटो कॅमरी, एमव्ही ऑगस्टा या अलिशान गाड्यांचा समावेश आहे. यामधील १३ गाड्यांचा लिलाव होणार आहे. या १३ गाड्यांची किंमत २ कोटी ८६ लाख ९६ हजार इतकी आहे.

प. बंगालमध्ये CAAविरोधातील आंदोलनात गोळीबार

या १३ गाड्यांची एवढ्या किंमतीत होणार विक्री - 

पोर्शे - ७८ लाख १० हजार

बीएमडब्ल्यू - ८५ लाख ७० हजार

ऑगस्टा - २६ लाख ६४ हजार ५५९

बीएमडब्ल्यू - ४१ लाख 

कॅमरी - १६ लाख ८७ हजार

सॅन्ट्रो एक्सओ बीएस -१ लाख २० हजार

क्वॉलिस - २ लाख ५० हजार

इटीओस व्हीडी - ४ लाख ३० हजार

इनोव्हा २.५ - ८ लाख ४७ हजार

इनोव्हा २.५ - ४ लाख ५० हजार

इनोव्हा २.५ -८ लाख ५० हजार

इनोव्हा २.५ - ६ लाख १८ हजार

इनोव्हा २.५ - ३ लाख 

गर्भपातासाठीच्या कालावधीत वाढ, सुधारित विधेयकाला मंत्रिमंडळाची