पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इंदापूरमध्ये प्रेमप्रकरणातून मुलाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

इंदापूरमध्ये मुलाला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

आंतरजातीय विवाहप्रकरणात मुलीसह जावयाला पेटवून दिल्याची नगरमधील घटना ताजी असताना पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये प्रेम प्रकरणातून १९ वर्षीय मुलाला अंगावर रॉकेल आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादाय प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात किस्मत शब्बीर शेख (नरसिंगपूर) हा गंभीररीत्या भाजला असून त्याच्यावर सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संतोष घोरपडेसह तीन आरोपींविराधात इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

किस्मत हा चिकन विक्रेता असून त्याचे नरसिंगपूर येथील गावातीलच एका मुलीसोबत गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. संबंधित मुलीच्या कुटुंबियांना हा प्रकार समजल्यानंतर कुटुंबियांनी प्रथम आपल्या मुलीला मारहाण केली. त्यानंतर संशयित आरोपी संतोष घोरपडेने ३ मेला किस्मतला आपल्या घरी बोलावून मुलीचा नाद सोड, असे सांगत शिवीगाळ केली.

एवढ्यावरच न थांबता संतोष घारपडे यांच्या साथीदारांनी यावेळी किस्मतच्या अंगावर रॉकेल आणि पेट्रोल टाकत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात तो ५० टक्के भाजला असून त्याच्यावर सोलापूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इंदापूर पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करत आहेत.