पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पिंपरी-चिंचवडचे तिघे कोरोनामुक्त; टाळ्या वाजवत दिला डिस्चार्ज

पिंपरी-चिंचवडच्या कोरोनाबाधित रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

पुण्याच्या ५ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आणखी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचडवच्या तीन कोरोनाबाधित रुग्णांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला. या कोरोनाबाधित रुग्णांचा दुसरा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयातून त्यांना दुपारी डिस्चार्ज देण्यात आला.

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयांनंतर नरेंद्र मोदी म्हणाले...

कोरोनाविरोधातील लढाई यशस्वीरित्या जिंकल्याबद्दल पिंपरी-चिंचवड पालिका रुग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि टाळ्या वाजवत त्यांना घरी सोडले. गेल्या १६ ते १७ दिवसांपासून त्यांच्यावर  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी त्यांची दुसरी कोरोना तपासणी करण्यात आली. हा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

कोरोनाविरोधातील लढाईसाठी साई संस्थानकडून ५१ कोटींची मदत

पिंपरी-चिंचवडचे हे तिन्ही कोरोनाबाधित रुग्ण दुबईवरुन आले होते. पुण्याच्या पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्यांसोबत ते दुबईला सहलीसाठी गेले होते. या दाम्पत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या पिंपरीच् याया तिघांची देखील कोरोना तपासणी करण्यात आली होती. ११ मार्चला त्यांचा तपासणी अहवाल आला. यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिघांनाही पालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.