पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आनंदाची वार्ता, पुण्यातील आणखी ५ कोरोना रुग्णांना देणार डिस्चार्ज

कोरोना विषाणू

राज्यात  कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढत आहे, मात्र दिलासादायक बाब म्हणजे यातून रुग्ण बरे होऊन घरीही परतत आहेत. पुण्यातील आणखी पाच जणांना आज डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

विश्वचषकातला 'हिरो' जोगिंदर कोरोनाविरोधातील लढाईत ठरतोय 'जगाचा हिरो'

गेल्याच आठवड्यात राज्यातील कोरोना विषाणू बाधित पहिल्या जोडप्याला डिस्चार्ज दिल्यानंतर आता पुण्यातील आणखी पाच जणांना आज डिस्चार्ज देण्यात येईल. पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही माहिती दिली.

कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केल्यावर १४ दिवसांनंतर या रुग्णांच्या पुन्हा चाचण्या करण्यात आल्या. चाचणीअंती या सर्वांचे कोरोनाचे रिपोर्ट हे निगेटीव्ह आले आहेत. ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे हे पाच जण आपल्या घरी परतणार आहेत.

कोरोनाशी लढा : टाटा ट्रस्टनंतर टाटा सन्सकडून १ हजार कोटींची मदत

आतापर्यंत पुण्यात एकूण ३६ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यातील १० जणांना यापूर्वीच डिस्चार्ज देण्यात आला आहे.