पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील मद्य विक्रीची दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश

मद्य विक्रीची दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद राहणार

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील मद्यविक्रीची दुकाने ३० मार्चपर्यंत बद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तारांकित हॉटेल्सना यातून वगळण्यात आले असून १८ मार्चपासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. कायद्याचे उल्लंघन करुन  मद्य विक्री करताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.  

पुण्यात कोरोनाचा नवा रुग्ण, राज्यात बाधितांची संख्या ४२ वर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाणे किंवा वास्तव्य करणे टाळण्याची आवश्यकता असून विषाणूची लागण एका संक्रमित व्यक्तीकडून अन्य व्यक्तीस होण्याची शक्यता विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी एका परिपत्रकाच्या माध्यमातून यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. जारी करण्यात आलेल्या  परिपत्रकातील माहितीनुसार, महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधील १४२ अन्वये मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  आदेशाचे उल्लंघन करुन मद्य विक्री केल्यास महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियमन १९४९ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा उल्लेख परिपत्रकाध्ये करण्यात आला आहे.  

कोरोनाशी लढा : पुण्यातील सर्व रेस्तराँ आणि बार बुधवारपासून बंद

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाने एकाचा बळीही घेतला असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. बुधवारी पुण्यात कोरना विषाणूची लागण झालेला १८ वा रुग्ण आढळला असून राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ४२ वर पोहचला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले असून या संकटाचा सामना करण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. यापूर्वी जीवनावश्यक वस्तूशिवाय अन्य वस्तूंच्या विक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता मद्य विक्रीची दुकाने ३० मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Covid19 coronavirus Pune Collector Orders to close liquor Shop at Pune and Pimpari chinchwad area till 31st March