पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड-१९: पुण्यातील सील करण्यात आलेल्या परिसरात कर्फ्यू लागू

मुंबई पोलिस (प्रातिनिधिक छायाचित्र)

शहरातील सील केलेल्या काही भागांत मंगळवारी सांयकाळी ७  वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत कर्फ्यू लागू राहणार असून  पुणे पोलिसांकडून यासंदर्भात स्वतंत्र आदेश काढण्यात आले आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. राज्यात आतापर्यंत हजारहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्याही वेगाने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील ठराविक परिसर सील करण्याचा निर्णय यापूर्वी महापालिका प्रशासनाने घेतला होता. 

कोविड-१९ : पुण्यातील हा परिसर सील करण्याचे आदेश

कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील अशोक म्युज सोसायटी- आशीर्वाद चौक, मिठानगर- सत्यानंद हॉस्पीटल गल्ली, भैरोबा मंदीर पीएमटी बस स्थानक, संत गाडगे महाराज शाळा- साई मंदीर ब्रम्हा एव्हेन्यू सोसायटी, शालीमार सोसायटी, कुमार पृथ्वी गंगाधाम रोड- मलिक नगर, खडक पोलिस स्थानकाच्या हद्दीसह फरासखान, स्वारगेट आणि  पोलिस हद्दीतील भागात संचार करण्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेश पोलिसांनी काढले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी विशेष वेळ देण्यात येणार असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, अशा सूचनाही नागरिकांना देण्यात आल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी केंद्रे ही दिवसभरातून केवळ दोन तासच सुरु राहणार आहेत.

पुणे जिल्ह्यात १५७ कोरोनाबाधित रुग्ण

पुणे जिल्हयातील कोरोना सांसर्गिक रुग्ण संख्या एकूण १५७ झाली आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये दाखल झालेली रुग्णसंख्या रुग्णालयामध्ये १३६ असून पिंपरी ‍चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील रुग्णालयामध्ये एकूण २१ रुग्ण दाखल झाले आहेत. आतापर्यंत २७ रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. तसेच ५ रुग्णांचा मृत्यु झाला असून उर्वरीत १२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यामधून तपासणीसाठी पाठविलेले एकूण नमुने २ हजार २५५ होते. त्यापैकी २ हजार १५८ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून ९७ चे अहवाल प्रतिक्षेत आहेत. प्राप्त अहवालांपैकी २ हजार १ नमुने निगेटीव्ह आहेत व १५७ नमुने पॉझिटीव्ह आहेत.