पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड १९ :घाबरु नका! ICAR प्रमुखांनी शेतकरी बांधवांना दिला धीर

आयसीएआरचे प्रमुख त्रिलोचन महापात्रा


कृषी शिक्षणाला गती देण्यासाठी कार्यरत असलेल्या भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा संदेश दिला आहे. आयसीएआरचे प्रमुख त्रिलोचन महापात्रा यांनी एका परिपत्रकाच्या माध्यमातून दिलेल्या संदेशातून कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून आपण यशस्वीरित्या बाहेर पडू, असा विश्वास शेतकरी बांधवांना दिला आहे.  

'सरकारने सर्व अटी मागे घेत ३ महिन्यांचे धान्य एकत्र द्यावे'

कोरोनाला लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या सोशल डिस्टन्सिंगचे शेतकरी बांधवांनी पालन करावे, असा संदेश त्रिलोचन महापात्रा यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून दिलाय. लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये जीवनावश्य वस्तूसंदर्भात कोणतेही निर्बंध नाहीत. शेती व्यवसायावर कोणतीही बंधने नसून शेतीमधून फळे-भाजीपाला काढत असताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही आयसीएआरकडून करण्यात आले आहे. शेती, मस्य पालन, पशुपालन संदर्भात कोणतीही समस्या असेल तर जवळच्या कृषी केंद्रावर संपर्क साधा, अशी सूचानाही शेतकाऱ्यांना देण्यात आली आहे. 

मोदींच्या आवाहनावर आव्हाड-मलिकांची टीका तर रोहित पवारांकडून स्वागत

जुन्नरमधील रश्मीकुमार कृष्णकुमार अब्रोल यांनी आपल्या गावातील सद्य परिस्थीती सांगितली आहे. 'गावात ऊस तोडणीला आला आहे. कोरोनामुळे ऊस तोडणीसाठी मजूर मिळत नाहीत. काही ऊस तोड कामगार मिळाले. पण पोलिसांनी त्यांना जबर मारहाण केली. यामुळे ते खूपच घाबरले आहेत. भाज्या, फळं, पीक पूर्णपणे तयार आहे. गावात ५०० एकरवर ऊस तोडणीसाठी तयार आहे.  आम्ही सोशल डिस्टन्स तसेच इतर सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करु मात्र शेतीचं काम थांबवू,नये अशी विनंती त्यांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनची परिस्थिती असली तरी अत्यावश्यक सेवांसोबतच कृषी क्षेत्रालाही निर्बंधनातून वगळण्यात आले आहे. राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.