पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'डोळ्यासमोर बायको वाहून गेली अन् मी काहीच करू शकलो नाही'

पुण्यात आंबिल ओढ्याला आलेल्या पुरानंतर झालेली स्थिती

पुण्याच्या दक्षिण भागात बुधवारी रात्री अतिप्रचंड पावसानंतर आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामध्ये सहकार नगरमधील टांगेवाला कॉलनीत राहणाऱ्या ४० वर्षांच्या ज्योत्स्ना राणे वाहून गेल्या. माझ्या डोळ्यासमोर माझी बायको पुराच्या पाण्यात वाहून गेली पण मी काहीच करू शकलो नाही, याबद्दल संजय राणे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. 

ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय मी तहकूब केला : शरद पवार

पुण्यात खूप कमी वेळेत झालेल्या जोरदार पावसानंतर आलेल्या पुरात एकूण १८ जणांचा बळी गेला आहे. चार तासांच्या कालावधीत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पुण्याच्या दक्षिण भागामध्ये पडला. राणे म्हणाले, त्या दिवशी आम्ही सगळे घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होतो. पण एकदम पाण्याचा लोंढा आला आणि त्यामध्ये ज्योत्स्ना वाहून गेली. मी तिला वाचवूच शकलो नाही. तिचा हात पकडू शकलो नाही की तिला रोखूही शकलो नाही. ती माझ्या डोळ्यासमोर वाहून गेली. त्यानंतर आम्हाला तिचा मृतदेहच मिळाला.

हा सगळा प्रकार आम्हा सगळ्यांसाठी अत्यंत धक्कादायक आहे. माझा मुलगा वरदसाठी तर हा प्रसंग अतिवेदनादायी असाच आहे. त्याला आता त्याची आई कधीच दिसणार नाही, असे सांगताना राणे यांचे डोळे पाणावले होते.

NASA ने जारी कली Chandrayaan-2 संदर्भातील छायाचित्रे

आंबिल ओढ्यावर झालेली अतिक्रमणे आणि या ओढ्याच्या नैसर्गिक प्रवाहात आलेले अडथळे यामुळे बुधवारी रात्री काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याचे पुणे महापालिकेच आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. सहकार नगरमध्ये गंगातीर्थ सोसायटीमागे टांगेवाला कॉलनी आहे.