पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नियम मोडणाऱ्यांना पुणे पोलिसांचा 'प्रसाद', १ दिवसांत १५१६ वाहने जप्त

पोलिस नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करताना

वारंवार सांगूनही न ऐकणाऱ्यांना पोलिसांचा खास प्रसाद मिळत आहेत. पोलिसांच्या दांड्याचे फटके खाऊनही अनेक जण ऐकत नाही अशाविरोंधात आता पुणे  पोलिसांनी नवी कारवाई सुरु केली आहे. काहीही काम नसताना दुचाकी किंवा चारचाकीवरुन रस्त्यावर भटकणाऱ्यांची वाहने पुणे पोलिसांनी जप्त करायला सुरुवात केली आहे. १ एप्रिलला पुणे पोलिसांनी शे दोनशे नाही तर तब्बल १५१६ वाहने जप्त केली. संचारबंदीच्या कारवाईचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. 

कोरोनावर लस निर्मितीसाठी DNA-RNA आधारित पद्धतीमुळे वेग

तसेच ३८२ नागरिकांवर कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात आली. तर १२८७ नागरिकांना नोटीस बजावण्यात आली. परिस्थितीचं गांभीर्य समजा आणि घरीच बसून सहकार्य करा अशी विनंती पुणेकरांना पोलिसांनी केली आहे. देशात प्रवासबंदी असतानाही अनेक जण दुचाकीवरुन रस्त्यावर विनाकारण भटकताना दिसून आले आहेत. अशांविरोधात पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे.

रामनवमी निमित्त पंतप्रधान मोदींचे टि्वट, म्हणाले, जय श्रीराम !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील बेजबाबदार वागणाऱ्यांना इशारा दिला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

स्वस्तात व्हेंटिलेटर, पुण्यातील तरुण इंजिनिअर्सचा कौतुकास्पद प्रयत्न