पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात सोमवारी तीननंतर रस्त्यावरील वाहतूक बंद, पोलिसांचा निर्णय

पुण्यात सोमवारी सकाळी तुरळक वाहतूक दिसत होती. (फोटो - धीरज बेंगरूट)

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पुण्यामध्ये लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. तरीही अनेक नागरिक सोमवारी सकाळपासून रस्त्यावर येत असल्याचे दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी सोमवारी दुपारी तीननंतर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा आदेश कायम राहिल. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहतूकच सुरू ठेवण्यात येईल.

कोरोनाविरोधात लढा : राज यांनी केलं ठाकरे सरकारचं कौतुक

सोमवारी सकाळपासून पुणे पोलिसांकडून विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहनचालकांची चौकशी केली जात आहे. त्यांच्याकडे ओळखपत्र असले आणि ते अत्यावश्यक सेवेशी संबंधित असले तरच त्यांना सोडण्यात येत आहे. सोमवारी दुपारीनंतर केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांनाच रस्त्यावरून वाहन चालविण्याची अनुमती देण्यात येईल. 

ट्विटरवर एका नागरिकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पुण्याचे पोलिस आयुक्त के व्यकंटेशम यांनी म्हटले आहे की, सोमवारी संध्याकाळपासून पुणे शहरातील रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात येईल.

भीमा-कोरेगाव हिंसाचार चौकशी आयोगाने सुनावणी पुढे ढकलली

राज्यात पुण्यामध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील सर्व दुकाने, उद्योग, व्यवसाय ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.