पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे : कोरोनाबाधित कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या ४० जणांचा शोध सुरु

पुणे

पुण्यातील दुबईहून परतलेल्या एकाच कुटुंबातील आई-वडील आणि मुलीसह त्यांच्या सहवासातील आणखी दोघांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  आता या जोडप्याच्या, प्रवासादरम्यान संपर्कात आलेल्या चाळीस जणांचा शोध घेण्यासाठी प्रशासनानं ५ तुकड्या तयार केल्या आहेत. 

या तुकड्यांमध्ये पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा पोलिसांचा समावेश आहे. या कुटुंबीयांशी प्रवासादरम्यान संपर्कात आलेल्या प्रत्येकाचा शोध घेण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली. 

कोरोना : CM उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक, IPL वरही चर्चा होणार

दुबईवरुन परतताना त्यांच्यासोबत एकूण ४० प्रवासी होते. त्या प्रत्येकाची आरोग्य चाचणी केली जाणार आहे.  हे प्रवासी देशातल्या विविध राज्यातले आहेत. आम्ही रुग्णांची कोणत्याही प्रकारची खासगी माहिती उघड करणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

पुण्यातील त्या कोरोना बाधित जोडप्याची प्रकृती स्थिर असून त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. पुण्यातील  हे जोडपं १५ दिवसांची  दुबईवारी करून परतलं होतं. दुबईहून परतलेल्या या जोडप्याच्या मुलीला देखील कोरोनाची लागण झाली. दुबईहून मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर हे जोडपं ज्या टॅक्सीने पुण्यात आले होते त्या टॅक्सी चालकालाही कोरोनाची लागण झाली असून या कुटुंबीयांनी ज्या विमानातून प्रवास केला त्या विमानातील सहप्रवाशालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या पाचही रुग्णांवर नायडू रुग्णालयातीव विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत. 

MP: भाजप आमदारही राज्याबाहेर, काँग्रेस मंडळी बंडखोरांच्या भेटीला