पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पिंपरी-चिंचवडच्या ४२ डॉक्टरांचे रिपोर्ट निगेटिव्ह

कोरोना विषाणू

पिंपरी-चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयातील ४२ डॉक्टरांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. एका कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना संपर्कात आलेल्या ४२ डॉक्टर्स आण ५० कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या सर्वांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. ४२ डॉक्टरांचा अहवाल आला असून त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर उर्वरीत ५० कर्मचाऱ्यांचा अहवाल येणे बाकी आहे. 

कोरोना क्वारंटाईन वॉर्डसजवळ पशू-पक्षी येऊ देऊ नका, अन्यथा...

पिंपरी-चिंचवड येथे ३१ मार्च रोजी अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपाचारा दरम्यान रिक्षाचालकाला श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर या खासगी रुग्णालयाने खबरदारी म्हणून सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते.

'लॉकडाऊन १५ तारखेनंतर शिथील होईल असं गृहीत धरु नका'

डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची स्वॅब घेत तपासणीसाठी पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. रात्री उशिरा ४२ डॉक्टरांचा तपासणी अहवाल आला. सर्व डॉक्टर्सना कोरोना झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर आता उर्वरित ५० कर्मचाऱ्यांचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तर याआधी रिक्षाचालकाच्या १० नातेवाईकांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. त्यांचा अहवाल देखील निगेटिव्ह आला होता.

राज्यातील ८७% कोरोनाबाधित रुग्ण मुंबई-पुण्यात