पिंपरी-चिंचवडमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पण या कलमातील तरतुदींच्या अंमलबजावणीत सौम्यता आणण्यात आली आहे. या संदर्भात काढण्यात आलेल्या सरकारी आदेशामध्ये नागरिकांना केवळ गर्दी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचाही समावेश आहे. मूळ १४४ कलमातील तरतुदींनुसार ४ पेक्षा अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. त्याचा स्पष्ट उल्लेख या आदेशात करण्यात आलेला नाही.
पुण्यातील जमाव बंदीच्या प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण
पुण्यातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी तसेच महापालिका, पोलिस आयुक्त यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली आहे. संध्याकाळपर्यंत राज्य सरकारकडून खबरदारीच्या संदर्भात अन्य सूचना मिळतील. असे पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. पुण्यातील कोरोना विषाणूबाधितांचा आढावा देताना ते म्हणाले की, मागील २४ तासांमध्ये पुण्यातील नायडू रुग्णालयात कोरोना विषाणूची लागण झालेला एक रुग्ण आढळला. २६ रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याची माहिती देखील त्यांनी दिली. यावेळी त्यांनी पुण्यातील रुग्णाच्या सानिध्यात येऊन कोरोनाची बाधा झालेला टॅक्सी चालक हा ओला किंवा उबरचा नव्हता, अशी माहिती दिली.
येस बँकेवरील निर्बंध बुधवारी सहा वाजल्यापासून मागे - रिझर्व्ह बँक
रविवारी परदेशातून परतलेल्या नागरिकांची चाचणी घेण्यात आली असून, जर्मनीमधून परतलेल्या एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली असून त्याचे सॅम्पल घेण्यात आली असून त्याला निरीक्षणाखाली नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पुण्यातील आयटी कंपन्यांशी चर्चा करुन कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यासंदर्भात मुभा देण्याबाबत सूचना करण्यात येणार असल्याची माहितीही दीपक म्हेसेकर यांनी यावेळी दिली. पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १६ वर पोहचला असून यातील पिंपरी-चिंचवडमधील ९ जणांचा समावेश आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वी पुण्यातील जमावबंदी संदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना असतील, अशी माहिती दिली होती. अधिकाराचा गैरवापर होणार नाही, अशा सूचना राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असेही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले होते.