पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...तर कारवाई करु, पुणे पोलिसांचा शहरात वसलेलेल्या गावकऱ्यांना इशारा

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.

सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद असून आंतरजिल्हा प्रवासाकरिता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवासासाठी बाहेर पडू  नये, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे. जर कायद्याचे उल्लंघन करुन कोणी प्रवास करताना आढळले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पुणे पोलिसांच्या अधिकृत ट्विट अकाऊंटच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करत यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

कोरोनाशी लढा: 'PM केअर्स'ला हातभार लावा, मोदींकडून जनतेला आवाहन

संदीप पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर आंतरजिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. मागील दोन दिवसांत मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे जिल्ह्यातून नागरिक स्वत:च्या किंवा खासगी वाहनातून सातारा, सांगली तसेच कोल्हापूरच्या दिशेने जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्याच्या सीमा आणि राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. जे कोणी सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

कुणाचं काय तर कुणाचं काय, ऋषी कपूर म्हणतात, मद्य विक्रीला परवानगी द्या

सध्याच्या परिस्थितीला गावी जाण्याच्या इराद्याने बाहेर पडला तर तुम्ही रस्त्यावर अडकून राहू शकता. लॉकडाऊन असताना स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रवास करणे टाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावी, असे आवाहन संदीप पाटील यांनी केले आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेऊन राज्य सरकारने संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. या निर्णयानंतर अत्यावश्यक सेवा वगळून सर्व सेवा ठप्प आहेत. या परिस्थितीत गावाकडून कामाच्या निमित्ताने शहरात गेलेली मंडळी घरी जाण्यासठी धडपडताना दिसत आहेत.  दुसरीकडे अनेक ग्रामीण भागातील शहरातून येणाऱ्या आपल्याच लोकांसाठी नो एन्ट्रीचा पवित्रा ग्रामस्थानी घेतला आहे. अशा परिस्थितीत शहरात असणाऱ्यांनी आहोत तिथेच राहून सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करणे फायदेशीर ठरेल.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Coronavirus lockdown Dont travel of From City To rural Area Otherwise taken legal action Those People says Pune Police