जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू राज्यात वेगाने परसताना दिसत आहे. आठवड्याच्या सलग तिसऱ्या दिवशी पुण्यात कोरोनाची लागण झालेले ३ रुग्ण आढळले आहेत. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी दुबईहून परतलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली होती. पती-पत्नीनंतर त्यांच्या मुलीला आणि या कुटुंबियांना मुंबई विमानतळावरुन पुण्याला पोहचवणाऱ्या टॅक्सी चालकाला कोरोनाची लागण झाल्याचे दुसऱ्या दिवशी समोर आले.
लोकांना घाबरवत का आहात, राज ठाकरेंचा सवाल
त्यानंतर बुधवारी आणखी ३ रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. नव्याने ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे ते देखील पहिल्या रुग्णांच्या संपर्कातीलच असल्याचे समजते. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी कोरोना विषाणूच्या साखळीनं पुण्यातील आठ जण कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. या सर्व रुग्णांवर पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कोरोनाची लागण झालेला राज्यातील पहिला रुग्ण पुण्यात आढळल्यानंतर या आठ रुग्णांसह मुंबईतल दोन कोरोनाग्रस्तांसह राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हा १० वर पोहचला आहे.
'CAA समर्थनार्थ रॅलीमुळे दिल्ली हिंसाचार घडला असे म्हणता येणार नाही'
सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे शहरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या भागातील लोकांना कोरोनाची लागण झाली आहे त्या भागातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी पुण्यातून करण्यात आली होती. मात्र तुर्तास अशा प्रकारे सार्वजनिक सुट्टीची काही गरज नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. पुढील दोन दिवसांत प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवणार असून आवश्यकता पडल्यास हा निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.