पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सात दिवसांसाठी कर्फ्यू लागू

पुणे पोलिस (संग्रहित छायाचित्र)

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे शहरात लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आला आहे. मध्यरात्रीपासून पूणे शहर सील करण्यात आले आहे. पुढील सात दिवस शहरात कडक कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याठिकाणी फक्त जीवनावश्यक सेवा सुरु राहणार असल्याचे पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

एका दिवसात राज्यात कोरोनाचे ५५२ नवे रुग्ण

पुणे महापालिका आयुक्तांनी रात्री उशिरा पत्र जारी करत हे आदेश दिले आहेत. रविवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून पुढील आदेश मिळेपर्यंत पुणे महापालिका हद्द सील करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित पोलिस ठाण्याचे प्रमुख आपल्या भागांच्या हद्द सील करतील, असे आदेश देण्यात आले आहेत. तर या भागात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने फक्त सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत. 

पालघर प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा देणार - मुख्यमंत्री

पूणे महापालिका क्षेत्र हे संक्रमनशील म्हणून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या भागामध्ये फक्त जीवनावश्यक सेवा म्हणजे आरोग्य विषयक, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, महापालिका आणि शासकीय सेवा सुरु राहतील, असे आयुक्तांनी दिलेल्या आदेशात सांगितले आहे. 

कोरोनामुक्त होणारं गोवा पहिलं राज्य, सर्व रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

पुण्यात कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली जाणार असून जे कोणी उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी गरजेशिवाय कुठल्याच कारणासाठी बाहेर पडू नये, असं आवाहन पोलिसांनी केले आहे. कर्फ्यू दरम्यान जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींना आणि त्यांच्या वाहनांना वगळण्यात आले आहे.

यू-टर्न !, ई-कॉमर्स कंपन्यांकडून फक्त जीवनावश्यक वस्तुंचीच विक्री